मराठी साहित्याचा समृद्ध प्रवास
रसिक वाचकहो,
उषा पब्लिकेशनची वाटचाल २९ जून २०१३ रोजी सुरू झाली. इतिहास, भारतीय संस्कृती, ज्ञानपरंपरा आणि संशोधनात्मक लेखन यांना केंद्रस्थानी ठेवून दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविणे तसेच विविध भाषांतील महत्त्वपूर्ण साहित्य मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे, ही या वाटचालीमागची प्रमुख भूमिका राहिली आहे.
या प्रवासात विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि आशयसमृद्ध साहित्य प्रकाशित होत गेले. काळानुरूप उषा पब्लिकेशनच्या कार्याची व्याप्तीही विस्तारत गेली. अनेक मान्यवर, लेखक, अभ्यासक, संशोधक आणि साहित्यप्रेमी या संस्थेशी अर्थपूर्णरीत्या जोडले गेले आणि त्यांच्या मार्गदर्शन, सहकार्य व सदिच्छांमुळे ही वाटचाल अधिक समृद्ध होत गेली.
पुस्तक प्रकाशनाबरोबरच भारतीय इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान, साहित्य, कला आणि समाजजीवन यांविषयी अभ्यासपूर्ण विचारांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने ‘इंडॉलॉजी कट्टा’ या उपक्रमाच्या माध्यमातून अभ्यासक आणि रसिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.
ज्ञान, संशोधन आणि साहित्य यांचा समृद्ध वारसा अधिकाधिक वाचकांपर्यंत आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे तसेच लेखक, अभ्यासक आणि वाचक यांना जोडणारे एक अर्थपूर्ण व्यासपीठ निर्माण करणे, हीच उषा पब्लिकेशनच्या पुढील वाटचालीची दिशा आहे.
आपले प्रेम, विश्वास आणि सदिच्छा यापुढेही उषा पब्लिकेशनच्या वाटचालीला लाभत राहतील, ही अपेक्षा.
धन्यवाद !
केयूर किशोर देशपांडे
ही पुस्तके आम्ही का प्रकाशित केली
दाराशुकोह
मूळ ‘दाराशुकोह’ ही मेवाराम लिखित कादंबरी वाचताना मला जाणवले की, हिंदू-इस्लामिक तत्त्वज्ञान परंपरांना जोडणारा विद्वान व सूफी साधक असलेल्या शहाजहानच्या ज्येष्ठ पुत्राच्या असामान्य जीवनाबद्दल मराठी भाषिक वाचकांना फारशी माहिती नाही. मराठी आवृत्तीमुळे सिंहासनापेक्षा ज्ञान आणि अध्यात्माची निवड करणाऱ्या आणि आजही समर्पक असणाऱ्या धार्मिक सलोख्याचा दृष्टिकोन बाळगणाऱ्या या शहाजाद्याची ओळख वाचकांना होईल, असे मला वाटले.
अधिक वाचासुल्तान रजियाा
मूळ ‘सुल्तान रजियाा’ ही कादंबरी वाचताना मला जाणवले की, अतुलनीय धैर्य आणि कौशल्याने राज्य करणाऱ्या दिल्लीच्या पहिल्या महिला तुर्क शासकाच्या इतिहासाबद्दल मराठी भाषिक वाचकांना फारशी माहिती नाही. मराठी आवृत्तीमुळे इल्तुतमिश आणि त्यांची कन्या रझिया या काळातील अत्यंत कुशल शासकांची ओळख वाचकांना होईल, असे मला वाटले. दरबारी राजकारण, सत्तासंघर्ष आणि पुरुषप्रधान जगात राज्य करणाऱ्या एका स्त्रीच्या धैर्याचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आढळते.
अधिक वाचादास्ताने आग्रा
मूळ ‘दास्ताने–आग्रा’ वाचताना मला जाणवले की, आग्र्याच्या वास्तूंमध्ये दडलेल्या समृद्ध इतिहासाबद्दल मराठी भाषिक वाचकांना फारशी माहिती नाही — ताजमहाल, आग्रा किल्ला आणि फतेहपूर–सीकरी येथे सांगण्यासारख्या असंख्य कथा आहेत. मराठी आवृत्तीमुळे वाचकांना या वैभवशाली इतिहासातून फिरता येईल आणि शहराला घडवणाऱ्या घटना व व्यक्तींची ओळख होईल, असे मला वाटले. इतिहास आणि प्रभावी कथनशैलीची सांगड घालत हे पुस्तक आग्र्याचा विसरलेला आवाज आणि चैतन्यमय भूतकाळ आजच्या वाचकांसमोर जिवंत करते.
अधिक वाचा